चीनला तगडा झटका, ओबीओआरमधून मलेशियाची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीनचा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर)ला तगडा झटका बसला आहे. मलेशियाने या प्रकल्पातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी चीनच्या दौऱ्यावर असतानाच ही घोषणा केली आहे. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांना हा बॉम्बगोळा टाकला आहे.

चीन आपल्या ‘वन बेल्ट वन रोड ’ (ओबीओआर)च्या नावाखाली जे पैसे देणार आहेत त्याचा वापर लोन ट्रॅपसारखा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचमुळे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी पैशाला हवाला देत या प्रकल्पातून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. मलेशियाचा हा निर्णय चीनच्या राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी स्वीकार देखील केल आहे.

‘वन बेल्ट वन रोड ’ (ओबीओआर) हा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या कार्यकाळातील चीनचा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. चीनचा आगामी दशकातील व्यापाराचे धोरण निश्चित करणारा हा मार्ग आहे. चीनच्या या महत्त्वकांशी प्रकल्पाला हिंदुस्थानसह जगातील अनेक देशांनी विरोध दर्शवला आहे. ओबीआरमधील पाकिस्तान हा चीनचा मोठा लाभार्थी आहे. हा प्रकल्प गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेमधून जात असल्याने याला हिंदुस्थानने विरोध केला आहे. आमच्या सार्वभौमुत्तावर हा घाला असल्याचे हिंदुस्थानने ठासून सांगितले आहे.