रत्नागिरीत फ्लॅट फोडून २ लाखाची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
theft cirme
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील संस्कृती अपार्टमेंटमध्ये बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी २ लाख २६ हजाराचा माल लंपास केला.

स्वाती प्रफुल्ल सावंतदेसाई या बाजारात गेलेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून फ्लॅट मधील २ लाख २४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २ हजाराची रोकड लंपास केली. या चोरीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.