कसोटी क्रमवारीमध्ये विराट कोहली नंबर वन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचा कर्णधार आणि ‘रनमशीन’ विराट कोहली पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीत नंबर वन झाला आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता आणि त्याचा फायदा त्याला क्रमवारीमध्ये झाला आहे. विराटने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला मागे सारत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

ट्रेंट ब्रिज कसटीमध्ये विराटने पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावांची खेळी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. या दणदणीत खेळीमुळे विराटच्या क्रमवारीत आणि रेटिंग पॉईंटमध्ये वाढ झाली आहे. विराटचे आता 937 रेटिंग पॉईंट झाले असून याबाबतीत त्याने आपलाच पूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

शास्त्रींनी केली विराट आणि सचिनची तुलना, म्हणाले…

सर्वकालिन टॉप 10 स्थानापासून एक पॉईंट दूर

विराट कोहलीच्या नावावर सध्या 937 रेटिंग पॉईंट असून सर्वकालिन टॉप 10 स्थानापासून तो फक्त एक पॉईंट दूर आहे. आतापर्यंत डॉन ब्रॅडमन यांनी 961 पॉईंट, स्टीव्ह स्मिथ 947 पॉईंट, लेन हटन 945 पॉईंट, जॅक हॉब्स आणि रिकी पॉन्टिंग 942 पॉईंट, पीटर मे 941 पॉईंट आणि गॅरी सोबर्स, क्लाईड वॉलकॉट, व्हीव्हीएन रिचर्डस व कुमार संघकारा 938 पॉईंट मिळवले आहेत.

कोहलीचा गांगुलीला धोबीपछाड, पण धोनी अजूनही सर्वोत्तम कर्णधार

विराटचा जबरदस्त खेळ –

कोहलीने इंग्लंड विरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यात दोन शतक ठोकले आहेत. या मालिकेत 73.33 च्या स्ट्राईक रेटनं त्यानं आतापर्यंत 440 धावा काढल्या आहेत. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर देखील हिंदुस्थानने तिसरी कसोटी जिंकली आहे.

IND VS ENG TEST : मुंबईकर पृथ्वी शॉ ची लॉटरी, कसोटी संघाचे दरवाजे उघडले

विराटच अव्वल

यंदाच्या वर्षी विराटने कसोटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. 2018 मध्ये सर्वाधिक धावा विराटच्याच नावावर आहेत. विराटने 2018 मध्ये आतापर्यंत 6 कसोटी सामन्यात 726 धावा चोपल्या असून यात त्याच्या 3 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.