
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
लोकसभा निवडणुकीसोबत यंदा 11 राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्यच नाही, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी स्पष्ट केले आहे.
आवश्यक कायदेशीर तरतुदीशिवाय हे शक्य नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. रावत यांनी येथे प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या वेळी त्यांना पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणे शक्य आहे का, हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोई चान्स नही, असे उत्तर देत भाजपच्या ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला जोरदार झटका दिला. पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम ठरलेला आहे, असेही रावत यांनी सांगितले.

































































