अल्पवयीन मुलीला कैद करून तीन महिने बलात्कार, सुरक्षा रक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

एका १६ वर्षांच्या मुलीवर तीन महिने बलात्कार केल्या प्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. मंजर (२५) असं या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. ही घटना दिल्लीजवळील गुरुग्राम इथे घडली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता सुरक्षा रक्षकाला आधीपासूनच ओळखत होती. ती ज्या कॉलनीत काम करते त्याच कॉलनीच्या सुरक्षा रक्षकाचे काम मंजर करतो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीडिता आपल्या कुटुंबासोबत पश्चिम बंगालला गेली होती. १३ मे रोजी मंजरही बंगालला पोहोचला आणि त्याने तिला भेटायला बोलावलं. त्यानंतर पीडिता त्याच्यासोबत गुरुग्राम येथे आली. तिथे आल्यानंतर त्याने तिला एका खोलीत कैद केलं आणि तिच्यावर सतत तीन महिने बलात्कार केला. तिने आरडाओरडा करू नये म्हणून तो तिला अंमली पदार्थ खायला घालत असे तसंच तिला मारहाणही करत असे. तिचा मोबाईल त्याने काढून घेतला होता. दिवसातून एकदाच तिला तो खायला प्यायला देत होता. २२ ऑगस्ट रोजी खोलीचं दार चुकून उघडं राहिलं आणि पीडिता ती संधी साधून पळून गेली.

पीडितेने आपलं घर गाठलं आणि कुटुंबीयांना घडलेली हकिकत सांगितली. इथे कुटुंबीयही ती गायब झाल्यामुळे चिंतेत होतं. त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी कारवाई करून मंजरविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजर हा बिहार येथील किशनगंज येथील रहिवासी आहे. त्याने यापूर्वीही असे कृत्य केलं आहे.

summary- minor girl got raped for three months