
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
आर्ट सर्कल आणि आसमंत बेनवोलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धेत रा.भा.शिर्के प्रशालेने सांघिक विजेतेपद पटकावले. . शहरातील विविध शाळांमधून 63 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात सर्वाधिक पारितोषिक रा.भा.शिर्के प्रशालेनेने मिळवले.
या स्पर्धक विद्यार्थ्यांकरिता श्रीकांत ढालकर यांचे मार्गदर्शनपर शिबिरही आयोजित करण्यात आले होते. मूर्ती घडवण्यापूर्वी लागणारा विचार, घडवताना वापरण्याचे तंत्र, या कामी वापरण्यात येणारी उपकरणे, कोणतही शिल्प बनवत असताना त्याची पूर्वतयारी या अनेक घटकांचा समावेश या कार्यशाळेत होता.





























































