गुरूग्राममध्ये मुसळधार पाऊस, पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्ली-एनसीआरला मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका गुरुग्रामला बसला असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात गाड्या अडकून पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

दिल्लीच्या काही भागांतही हीच परिस्थिती असून काही भागांत हलक्या स्वरुपाच्या पावसानेही पाणी साचलं आहे. काही घरांमध्येही पाणी शिरलं असून पालम परिसरात विमानतळालाही पावसाचा फटका बसला आहे.

summary- heavy rain in gurgaon created chaos