सिंधूचे सुवर्ण स्वप्न भंगले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

हिंदुस्थानची झुंजार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या आशियाई क्रीडा स्पर्धांतील ऐतिहासिक सुवर्णपदकाच्या लढतीवर तमाम हिंदुस्थानी क्रीडाशौकिनांचे लक्ष होते, मात्र सिंधूला या लढतीत रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. आशियाई स्पर्धांतील बॅडमिंटन या खेळाची फायनल गाठणारी सिंधू ही पहिली खेळाडू ठरल्याने तिचे सुवर्ण हुकले असले तरी तिची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. अंतिम लढतीत अव्वल मानांकित चिनी तैपेईच्या ताई त्झु यिंग हिने तृतीय मानांकित सिंधूला 34 मिनिटांत 21-13, 21-16 असे पराभूत केले.