ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता खडी केंद्रास मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हलगरा

निलंगा तालूक्यातील मौजे हलगरा येथे सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता, कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता खडी केंद्रास मंजुरी दिली. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

सरपंच मंगल पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता, ठराव मंजूर न करून घेता राजेवाडी (हलगरा) येथे खडी केंद्रास परवानगी दिली. मात्र खडी केंद्रास परवानगी रितसर पध्दतीने झालेली नाही. असे ग्रामस्थांचा म्हणणे आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याचा विचार न करता राजेवाडी येथील वस्तीजवळच हे खडी केंद्र सुरू होत आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.