
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावर देखरेख ठेवणाऱ्या बीएमआरचे एक चाक नांदगावजवळ पटरीवरुन खाली उतरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक दोन तास ठप्प होती.
कोकण रेल्वे मार्गावर देखरेख आणि दुरुस्ती ठेवणाऱ्या बीएमआरचे एक चाक नांदगाव जवळ रुळावरुन घसरले. ही घटना आज शनिवारी सकाळी पाच वाजता घडली. त्यानंतर बीएमआरचे चाक सकाळी सात वाजता पूर्ववत करण्यात आले. दरम्यानच्या काळात वाहतूक दोन तास ठप्प होती. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या गाड्या उशीरा धावत आहेत.
































































