तरुणीच्या अंघोळीचा व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी , पुणे

हॉस्टेलमधील बाथरूममध्ये अंघोळ करणाऱ्या तरुणींचे व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाला स्वत: तरुणींनी रंगेहाथ पकडून कोथरूड पोलिसांच्या हवाली केले. हा तरुण सीएचा अभ्यास करीत आहे. शरद दरेकर (वय २९, रा. शिक्रापूर) असे या तरुणाचे नाव आहे. २५ वर्षीय तरुणीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

कोथरूड येथे भेलकेनगरमध्ये असलेल्या एका अभ्यासिकेमध्ये शरद दरेकर हा सीएचा अभ्यास करण्यासाठी जातो. त्याच ठिकाणी मुलींचे हॉस्टेल आहे. हॉस्टेलच्या जिन्यात असलेल्या बाथरूममध्ये तरुणी अंघोळ करत असताना शरदने छोट्या खिडकीतून मोबाईल आतमध्ये घालून शूटिंग सुरू केले. या तरुणीचे त्याकडे लक्ष जाताच तिने प्रसंगावधान राखून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तिने मोबाईल तपासला असता, त्यात तिचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ दिसला.

दरम्यान, या प्रकाराबद्दल तरुणीने हॉस्टेल मालकाकडे तक्रार केली. काही वेळाने शरद तेथे जाऊन उद्धटपणे बोलून मालकाला मोबाईल परत मागितला. या तरुणीवर दादागिरी सुरू केली. त्यामुळे या तरुणीने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शरदला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल तपासला असता, त्यात फिर्यादी तरुणीसह इतर तरुणींचे फोटो व व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे.