हिंमत असेल तर भाजपने बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अशोक चव्हाण - 1) 8 डिसेंबर, 2008 ते 15 ऑक्टोबर, 2009, 2) 7 नोव्हेंबर, 2009 ते 9 नोव्हेंबर, 2010 (काँग्रेस)

सामना ऑनलाईन । सांगली

ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत आहे. भाजप सोडून इतर पक्ष ईव्हीएम मशीनविरोधात आहेत. त्यामुळे भाजपमध्ये खरी हिंमत असेल, तर त्यांनी लोकशाही मान्य करून लोकसभा व विधानसभा निवडणुकांत बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपला दिले.

काँग्रेसने ‘जनसंघर्ष यात्रा’ सुरू केली आहे. ही यात्रा सांगलीत आली होती. यावेळी काँग्रेस कमिटीसमोर जाहीर सभा झाली. या सभेत खासदार अशोक चव्हाण बोलत होते. सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील आदी उपस्थित होते.

खासदार चव्हाण म्हणाले, महापालिकेत काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे वाक्य आहे, ‘हार गये तो क्या फिर जितेंगे’. त्यामुळे काँग्रेस पुन्हा लोकसभा व विधानसभा निवडणुकांत कमबॅक करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप होत आहे. भाजपला खरी पारदर्शकता आणायची असेल व लोकशाही मान्य करायची असेल, तर त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे आव्हान खासदार चव्हाण यांनी दिले.