दहीहंडी नाही, मोदी-फडणवीस सरकारच्या पापाचा घडा फोडला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress-dahihandi

सामना प्रतिनिधी । कराड

काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनं करून भ्रष्टाचार, आत्महत्या, महागाई, एकाधिकारशाही याविरोधात नाविन्यपूर्ण हंडी उभी करून “मोदी फडणवीस सरकारचा पापाचा घडा” म्हणून ती फोडण्यात आली. यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून संघर्ष यात्रा मार्गस्थ झाली.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा काल रात्री कराडमध्ये आल्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती सदनामध्ये जाहीर सभा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विश्वजित कदम, आ. सतेज पाटील यांच्यासह सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्य व केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर खरपूस टीका केली. मोदी सरकारविरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन करून त्यांना सत्तेमधून बाहेर काढू असा निर्धार यावेळी करण्यात आला.

summary: congress breakes dahihandi againt modi government