वर्सोव्यात एकजण बुडाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

वर्सोवा समुद्रात आज एक मुलगा बुडाल्याची घटना सायंकाळी 5.50 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत एकूण चार मुले बुडाली होती. त्यापैकी सुदैवाने तिघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही.

वर्सोवा समुद्रकिनारी ही मुले सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी आली होती. समुद्रकिनारी फेरफटका मारल्यानंतर ही मुले समुद्रात पोहण्यासाठी उतरली. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले बुडू लागली. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने किनाऱ्याकर असलेले काही लोक मदतीला धाकून आले. त्यांनी समुद्रात बुडणाऱ्या तीन मुलांना वाचकले, मात्र एकजण पाण्याच्या प्रवाहाबरोबर काहून गेला. अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिसांमार्फत त्याचा शोध सुरू आहे.

एकावर आयसीयूमध्ये उपचार

या घटनेतील मुलांची नावे आयुश खंडूराइंदर (13), हर्ष अमोल कोळी (13), वैभव राकेश गौड (13), रेहान अन्सारी (13) अशी आहेत. यापैकी वैभव गौड याचा शोध अद्याप लागलेला नाही, तर रेहान याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्याकर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.