
सामना प्रतिनिधी , मुंबई,
अद्याप अकरावीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची शेवटची संधी देण्यात आली आहे. उद्या, 4 सप्टेंबरपासून प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरीचा दुसरा भाग सुरू होणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागणार असून आधी केलेली प्रवेश नोंदणी रद्द करावी लागणार आहे.
4 आणि 5 सप्टेंबरला अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर प्रवेश रद्द करण्याची लिंक ओपन करून देण्यात येणार आहे. आधी केलेली प्रवेश नोंदणी रद्द केल्यानंतर विद्यार्थी नव्याने नोंदणी करून ऑनलाइन अर्जाचा पहिला भाग भरून ठेवू शकतात. नव्याने प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावर माहितीपुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली.
अशी असेल प्रवेशप्रक्रिया
– 4, 5 सप्टेंबर – नव्याने नावनोंदणी, रिक्त जागांचा तपशील जाहीर.
– 5 सप्टेंबर – रिक्त जागा जाहीर.
– 6 सप्टेंबर – (सकाळी 10 ते सायंकाळी 5) पहिल्या गटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश.
– 6 ते 7 सप्टेंबर – (सकाळी 10 ते दुपारी 3) संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेणे.
– 7 सप्टेंबर – (सायंकाळी 7 वाजता) दुसऱया गटातील प्रवेशासाठी रिक्त जागा जाहीर.
– 8 सप्टेंबर – (सकाळी 10 ते सायं. 5) दुसऱया गटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश.
– 8 ते 10 सप्टेंबर – (सकाळी 10 ते दुपारी 3) संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेणे.
– 10 सप्टेंबर – (सायंकाळी 7 वाजता) दुसऱया गटातील प्रवेशासाठी रिक्त जागा जाहीर
– 11 सप्टेंबर – (सकाळी 10 ते सायं. 5) दुसऱया गटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश.
– 11 ते 12 सप्टेंबर – (सकाळी 10 ते दुपारी 3) संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेणे.
प्रवेशासाठी हे विद्यार्थी पात्र
आधीच्या प्रवेशफेऱ्यांत पहिल्या फेरीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले एकाही प्रवेशफेरीत प्रवेश न मिळालेले. मिळालेला प्रवेश रद्द केलेले आधी मिळालेला प्रवेश रिजेक्ट झाला असेल एटीकेटी सवलत मिळालेले नव्याने नोंदणी केली.
तीन गटांत होणार प्रवेश
60 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी तसेच 35 टक्के व त्यापेक्षा अधिक आणि एटीकेटीचे विद्यार्थी अशा तीन गटांत प्रवेश होणार आहेत.
























































