
सामना ऑनलाईन। गुवाहाटी
आसाममधील उत्तर गुवाहाटी येथे भाविकांना घेऊन जाणारी प्रवासी बोट ब्रम्हपुत्रा नदीत उलटल्याने 45 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बोटीतून नाविकांसह 45जण प्रवास करत होते. मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बोटीतून प्रवास करत होते. यामुळे बोट कलंटली व सर्व प्रवासी पाण्यात पडले. यातील बऱ्याचजणांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. दरम्यान, बोट बुडाल्याचे कळताच पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
summary–boat-with–45-passengers-capsized-in-brahmaputra-river-
























































