अनंतनागमध्ये चकमकीत दहशतवादी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबंधित होता. शुक्रवारी रात्री काही दहशतवाद्यांनी अनंतनाग जिह्यातील अच्छाबल येथील पोलीस पिकेटवर हल्ला केला होता. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव बिलाल अहमद असे असून तो कुलगामचा राहणारा आहे. त्याच्याकडे एके-47 रायफलही सापडली आहे. बिलाल तीन महिन्यापूर्वीच लष्कर-ए-तोयबामध्ये सामिल झाला होता. काही दिवसांपूर्वी काश्मीर खोर्यात झालेल्या हल्ल्यात आणि शस्त्रास्त्र लुटण्याच्या कारवाईत तो सहभागी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.