
सामना ऑनलाईन । नालासोपारा
मोरॅक असोसिएशन, मुंबईतर्फे आयोजित प्रथम पालघर जिल्हा मोरॅक अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरी, युवा मुले एकेरी, ज्युनियर मुले, ज्युनियर मुली, सब ज्युनियर मुले व सब ज्युनियर मुलींच्या गटात अनुक्रमे विश्वनाथ देवरुखकर, विशाल सोनावणे, अविराज अखाडे, श्रुती सोनावणे, अर्पण बांदिवडेकर यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले. नालासोपार्यात ही स्पर्धा झाली.
ज्युनियर मुलींच्या एकेरी गटाच्या अंतीम फेरीत श्रुती सोनावणेने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत नालासोपार्याच्या सिमरन शिंदेचा 43-27, 42-26 असा फडशा पाडत विजेतेपदावर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. सब ज्युनियर मुलांच्या एकेरी गटात विरारच्या अर्पण बांदिवडेकरने सरळ दोन गेममध्ये नालासोपार्याच्या रितेश मोहितेचा 32-18, 36-32 असे नमवित विजेतेपदाचा मान मिळविला. युवा मुले एकेरी गटाच्या अंतिम फेरीच्या सामन्यात विशाल सोनावणेने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात आक्रमक व बचावात्मक खेळाचे मिश्रण करत विरारच्या शशांक शिरोडकरला 38-32, 34-32 असे नमवले. सहा गटांत खेळविण्यात येणार्या या स्पर्धेला पालघर जिह्याच्या कानाकोपर्यातून जवळजवळ 200 स्पर्धकांचा विक्रमी सहभाग लाभला.




























































