
सामना ऑनलाईन । रेवाडी
बुधवारी हरियाणातील रेवाडीमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. चार दिवसांनंतरही मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांनी तीन आरोपींचे छायाचित्र जारी केले असून त्यात एका सैन्यातील जवानाचा समावेश आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी इतर तीन आरोपींना पकडले आहे. जिथे बलात्कार झाला त्या जागेचा मालक, एक डॉक्टर आणि आरोपीला पळवून जाण्यास मदर करणार्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जिथे बलात्कार झाला त्याचा मालक त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दुसरा व्यक्ती डॉक्टर आहे. जेव्हा पीडित मुलीची तब्येत बिघडली तेव्हा आरोपीने या डॉक्टरकडे तिला नेले होते. आणि तिसरा व्यक्ती आरोपीचा मामा असल्याचे कळाले आहे. आरोपीच्या मामाने घडलेल्या गुन्ह्यानंतर आरोपींना पळण्यास मदत केली होती.
तर दुसरीकडे इस्पितळाने पीडित मुलीचे मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. या बुलेटिननुसार पीडितेची प्रकृती स्थिर आहे. पीडित मुलगी अजूनही धक्क्यातून सावरली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच ती नैराश्यात जाण्याची भिती असल्याने नातेवाईंकाना तिला भेटण्यास मनाई केली असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले. पिडीतेच्या आईने योग्य उपचार न झाल्याचा आरोप डॉक्टरांनी फेटाळला आहे.
The victim’s condition is stable and she’s recovering from trauma. Her x-ray & ultrasound reports are normal. We will continue to review her condition regularly: Sudarshan Panwar, Medical Superintendent, Rewari district hospital on the condition of Rewari gangrape incident victim pic.twitter.com/63ZXfNAAdr
— ANI (@ANI) September 15, 2018
पिडीतेच्या आईने धनादेश केला परत
शनिवारी काही अधिकार्यांनी पीडितेच्या आईला अर्थसहय्याचा धनादेश सुपुर्द केला होता. पण आईने हा धनादेश परत देऊन आपल्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी केली. तसेच अजूनही पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याने त्यांनी नाराजी दर्शवली.
Some officials came yesterday to give me a compensation cheque. I am returning it today, as we want justice & not money. It has now been 5 days & none of the accused have been arrested till now: Mother of Rewari gangrape victim #Haryana pic.twitter.com/fRYGuTP7oj
— ANI (@ANI) September 16, 2018


























































