बीड जिल्ह्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा धडाक्यात शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी | बीड 

शिवसेना प्रमुख यांच्या आशिर्वादाने व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे , बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे  यांच्या आदेशाने व लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या प्रमुख उपस्थीतीत रविवारी माजलगाव, वडवणी, धारुर, केज, अंबाजोगाई, परळी या तालुक्यांसाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा  शुभारंभ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बार्शी रोड येथे करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख मुळूक म्हणाले की,  “येणाऱ्या निवडणुकीत लोकसभा व विधासनभा मतदार संघावर भगवा फडकवायचा आहे. पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेबांनी स्वबळाची घोषणा केलेली असून यामुळे सर्व शिवसैनिकांनी जबाबदारीने आपले काम पूर्ण करावे. या निवडणुका जिंकण्यासाठी सदस्य नोंदणी हा महत्त्वाचा भाग असून सर्व तालुक्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांचे स्वप्न करायचे आहे. त्या अनुषंगाने माजलगाव, परळी व केज या तीन विधासनभा मतदार संघात दीड लाख सदस्य नोंदणी करणार आहोत”, असे जिल्हाप्रमुख मुळूक यांनी सांगितले. तसेच लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे याप्रसंगी म्हणाले की, “शिवसेना व बाळासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी करणे गरजेचे आहे. विधानसभेवर एकाहती सत्ता मिळवण्यासाठी ही नोंदणी फार आवश्यक आहे”.

या शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीच्या शुभारंभप्रसंगी लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,उप जिल्हा प्रमुख  बाळासाहेब अंबुरे,  नारायण काशीद, जयसिंग चुंगडे, संजय महाद्वार, भारत जगताप, शहर प्रमुख सुदर्शन धांडे,   सुशील पिंगळे, संगीता चव्हाण, नवनाथ प्रभाळे, योगेश नवले, अभिजीत भालेकर, कल्याण जानवळे, सखाराम देवकर, आनंद शिंदे, बाबा गुरखुदे, मनोज गोडसे, अशोक गडदे, रत्नाकर येवले, विराज पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.