
सामना प्रतिनिधी, मुंबई
मध्य रेल्वेने महिलांच्या डब्यांना आकर्षक रंगसंगतीने सजविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माटुंगा वर्कशॉपमध्ये महिलांच्या डब्यातील भिंतींना फुलपाखरे चितारण्यात आली होती. आता नव्याने रंगविण्यात आलेल्या डब्यांत फिश ऍक्वेरियमचे दृश्य दिसणार आहे. लवकरच हे डबे सेवेत येणार आहेत.
प्रवाशांना डब्यात मन प्रसन्न करणारी रंगसंगती असवी अशा उद्देशाने हा नवा प्रयोग करण्यात येत आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये सिमेन्स लोकलमधील महिलांचा सेकंड आणि फर्स्ट क्लास डब्यात फिश ऍक्वेरियमचे दृश्य दिसणार आहे. माटुंगा वर्कशॉपचे ट्रेड ऍप्रेंटिस चंदू अगुरू आणि अमोल दाभाडे यांनी ही निसर्गचित्रे रंगविली आहेत.
summary- colorful coaches for central railway

































































