
सामना प्रतिनिधी । डहाणू
डहाणू तालुक्यातील आंबेसरी येथे दोन अल्पवयीन बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
सवू सखाराम उंबरसाडा (वय 16) साधना वीनू उंबरसाडा (वय 17) या दोघी आंबेसरी बारीपाडा येथील राहणाऱ्या आहेत. या चुलत बहिणींनी जवळच असलेल्या पारोळ जंगलातील उंबराच्या झाडाला गळफास घेउन केली आत्महत्या केली. दोघींचे मृतदेह डहाणू पोलिसांनी जंगलातून ताब्यात घेतले असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
summary: two sisters commit suicide at dahanu
























































