नवरदेवाला लग्नात मिळाला पेट्रोलचा आहेर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

इंधनाची दरवाढ रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. आता हे दर शंभरीपार होतील या धास्तीने सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. अशातच एका नवरदेवाला लग्नातला आहेर म्हणून चक्क पेट्रोल भेट म्हणून मिळाल्याची घटना घडली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई येथील कुड्डलूर या गावी एका विवाह सोहळ्यात ही घटना घडली आहे. नवदांपत्य रिसेप्शनसाठी उभं असताना नवरदेवाच्या मित्र मंडळींनी पाच लीटर पेट्रोलचा कॅन त्यांना आहेर केला. हे पाहताच सगळीकडे एकच हशा पिकला. नवरदेवाने या आहेराचा हसत हसत स्वीकार केला.

‘पतंजली’चे पेट्रोल-डिझेल 35 ते 40 रुपयाने विकेन!- बाबा रामदेव

तामिळनाडूत सध्या पेट्रोलचा दर ८५ रुपये लीटर इतका आहे. त्यामुळे आपल्या मित्राला देण्यासाठी या पेक्षा महागडा आहेर असूच शकत नाही, असा विचार करून मित्रांनी त्याला पेट्रोल भेट दिल्याचं बोललं जात आहे.

summary- groom received petrol as his wedding gift