अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नगरमध्ये निषेध मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-protest-rally

सामना प्रतिनिधी । नगर

नगर येथे दोन दिवसांपूर्वी एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सर्व समाजाच्या तसेच सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनी एकत्र येत नगर शहरातून शांततेत मोर्चा काढला. यावेळी गांधी मैदानापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. निषेधाचे फलक हात घेऊन अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा रोड कापड बाजार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार पोहोचणार असून तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

दरम्यान, काळ्याफिती लावून या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसह युवक तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.