खेकडे, मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

दापोली तालुक्यातील वणौशी गावात नदीवर खेकडे आणि मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

राजेंद्र सखाराम पदुकुले (वय ३५) हा मळे पंचनदी गावातून वाहणाऱ्या नदीच्या वणौशी गावातील डोहात खेकडे आणि मासे पकडण्यासाठी गेला होता. मासे पकडत असताना पाण्यात बुडाला. त्यानंतर एका डोहात एका किनाऱ्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळते.