उत्तराखंडात गाय ‘राष्ट्रमाता’, विधानसभेत ठराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । डेहराडून

देशात गोहत्या बंदीला विरोध करणाऱया मंडळींच्या डोळय़ांत अंजन घालणारा निर्णय आज उत्तराखंड सरकारने घेतला. उत्तराखंडच्या पशुसंवर्धनमंत्री रेखा आर्य यांनी गाईला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याचा ठराव विधानसभेत मांडला आणि उत्तराखंडच्या आमदारांनी तो बहुमताने मंजूर केला. सरकारने गंभीरपणे गोवंश विकासाचा कार्यक्रम राबवावा असे सांगत विरोधी पक्ष काँग्रेसनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला. आता अंतिम शिक्कामोर्तबासाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

गाय हा पर्यावरणाच्या दृष्टीनेही अतिशय उपयुक्त पशू आहे. जिचे गोमूत्र औषधी तत्त्वांनी भरलेले असतेच, पण ती ऑक्सिजन श्वासातून घेते आणि तो वातावरणात सोडतेही असा दावा उत्तराखंडच्या पशुसंवर्धनमंत्री आर्य यांनी केला, पण देशातील प्राणिशास्त्रज्ञांनी तो दावा अशास्त्राrय असल्याचे सांगून फेटाळला आहे.

गाईला राष्ट्रमाता दर्जा देण्यास आमचा विरोध नाही. पण उत्तराखंड सरकार रस्त्यावर भटकणाऱया गुरांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणार आहे का, हा आमचा सवाल आहे.
– इंदिरा हृदयेश, उत्तराखंडच्या विरोधी पक्षनेत्या

40 सदस्यीय गोवा विधानसभेत काँग्रेसला 21 आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे. आम्हीही शक्तिप्रदर्शनासाठी तयार आहोत.
– चंद्रकांत कवळेकर, विरोधी पक्षनेते, गोवा

देशभरात गोहत्या बंदीचे कठोर पालन व्हावे हाच उद्देश
गाईचे दूध, त्यापासून बनवले जाणारे सर्वच पदार्थ मानवजातीसाठी अत्यंत उपकारक ठरतात. तिच्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे तिचे रक्षण व्हायलाच हवे या उद्देशाने आम्ही गाईला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्याचा ठराव मंजूर केला आहे. देशभरात गोहत्या बंदीचा कायदा कठोरपणे लागू व्हावा हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे, असे प्रतिपादन रेखा आर्य यांनी केले.