
सामना ऑनलाईन । कल्याण
रस्त्यांची अवस्था खराब असतानाही मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर वसुली सुरू असते. त्याविरोधात शिवसैनिकांनी आवाज उठवत शुक्रवारी टोल बंद आंदोलन केले.
टोल कंपन्या या वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणार टोल वसूल करताता. मात्र त्या प्रमाणात सोई दिल्या जात नाही. महामार्गावर पडलेले खड्डे तसेच आहे. याविरोधात शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी टोल वसुली बंद पाडली.
यावेळी पोलिस प्रशासन व शिवसैनिकांनमध्ये काही तणावाचे वातावरण झाले. मात्र शिवसैनिकांनी आपल्या मुद्द्यावर ठाम राहात, जोरदार आंदोलन केले.



























































