मालदीव राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इब्राहिम विजयी; चीनधार्जिणे यामीन पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मालदीव

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार इब्राहिम महमद सोलीह हे विजयी झाले आहेत. पण अद्याप या विजयाची घोषणा निवडणूक आयोगाने अधिकृतपणे केली नाही. या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन हे पराभुत झाले. या निकालाचे हिंदुस्थानने स्वागत केले आहे. इब्राहिम यांचा हिंदुस्थानशी मैत्री करण्याचा कल आहे. यामीन यांच्या काळात हिंदुस्थान मालदीवचे संबंध ताणले गेलेले आहेत. यामीन चोया जास्त काल चीनकडे होता. इब्राहिम यांच्या विजयामुळे हिंदुस्थान-मालदीवमधील द्विपक्षीय संबंध सुधारतील असे मानले जात आहे.