माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे अनंतात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचे काल रविवारी दुपारी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. चंद्रपूर येथे त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रपूर जिह्यातील ज्येष्ठ काँगेस कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शांताराम पोटदुखे हे पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थराज्यमंत्री होते. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या  कुशल अर्थतज्ञाच्या नेतृत्वात त्यांनी अर्थखात्यातील व्यय विभाग यशस्वीरित्या सांभाळला होता. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून ते सलग 4 वेळा निवडून आले होते. अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.