
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आशिया कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडिया दमदार कामगिरी करत आहे. सुरुवातीचा हाँगकाँगविरुद्धचा सामना सोडल्यास त्यानंतरच्या प्रत्येक सामन्यात टीम इंडियाने विराधी संघाला प्रत्येक क्षेत्रात चारीमुंड्याचित केले आहे. रोहितच्या याच नेतृत्वाची प्रशंसा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सलामीवर सुनील गावसकर यांनी केली आहे. गावसकर यांनी रोहितची तुलना वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांच्याशी केली आहे.
गल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या !
गावसकर म्हणाले की, ‘कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा रोहित सामन्यादरम्यान आपल्या भावनांवर सहज नियंत्रण ठेवताना दिसत आहे. एखाद्या क्षेत्ररक्षकाने कॅच सोडला तर रोहित आपल्या भावानांवर नियंत्रण ठेवताना दिसत आहे. तो हलकासा हसतो आणि पुन्हा आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जागी परततो. त्याच्या या कृतीमुळे क्षेत्ररक्षकावर अतिरिक्त दबाव पडत नाही. अशाच प्रकारे क्लाइव्ह लॉईड कर्णधार असताना करायचा. अशावेळी तो भावनांवर नियंत्रण ठेवायचा.’ तसेच असे 90 च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघात व्हायचे आणि त्यांच्यातील संबंध खूपच चांगले होते, असेही गावसकर म्हणाले.
लोण्यावरून चालावं तसं आपण टार्गेटपर्यंत गेलो
यावेळी गावसकर यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन जबरदस्त फॉर्मात आङेत. ते प्रत्येक सामन्यात टीम इंडियाला चांगली सलामी देत आहेत. तसेच गोलंदाजीही दमदार होत आहे. भुवनेश्वरचे एक षटक सोडल्यास आतापर्यंत सर्वकाही चांगले झाले आहे.




























































