
नाटककार देवेंद्र पेम आवडत्या मत्स्याहाराचा मनसोक्त आस्वाद घेतात.
ऑमलेट
बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, किसलेलं खोबरं, चवीनुसार मीठ हे एकत्र करून घ्यायचं. तव्यावर तेल घालून ते तापलं की हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व मिश्रण बाजूला करून त्याच्यामध्ये एक होल करायचा. त्यात तेल साठतं. त्यामध्ये अंड फोडून घालायचं. वरून चवीनुसार मीठ, चीज, ऑरिगॅनो, मिक्स हब, तिखट हवं असल्यास चिली फ्लेस घालून परतवायचं.
- ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?
– भूक लागली की ती शमवण्यासाठी जे आपल्याला खावं लागतं ते. - खायला काय आवडतं?
– मांसाहारात सुरमई, पापलेट, हलवा आवडतं. शाकाहारही आवडतो. - खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
– बेसन आणि मैद्याची मला खूप ऍलर्जी आहे, त्यामुळे त्यापासून बनलेले पदार्थ खाणे टाळतो. चायनीज अजिबात खात नाही. त्यामुळे वडा-पाव, बेकरीतले पदार्थ पूर्णतः बंदच. गव्हाच्या पावासोबतच पाव भाजी खातो. अगदीच खाण्याची वेळ आली तर बटाटावडय़ांच्या वरच आवरण काढून त्यातली भाजी खातो. अति खाल्लं तर चालणं, पोहणं असे व्यायाम नियमित करतो. तरीही अतिखाण्यामुळे वजनवाढीचा त्रासाला मला कधी सामोरं जावं लागलं नाही. - आठवड्यातून किती वेळा बाहेर खाता?
– आठवड्यातून किमान एकदा…किंवा कधी कधी नाटकाचे प्रयोग आणि तालमीच्या निमित्ताने दोन-तीन वेळा बाहेर खाणं होतं. - कोणत्या हॉटेलमध्ये जाता?
– अंधेरीला ‘एम. एच. हॉटेल’ आणि पार्ल्यातलं ‘गझाली’ मध्ये मासे खायला आवडतात. मोठा ग्रूप असेल तर ढाब्यावरही जातो. - कोणतं पेय आवडतं?
– जेवताना सूप्स आणि इतरवेळी फ्रूट पंच, सोडा लेमन. - प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?
– जिथे दौऱ्याला जातो तिथे फिरून आधीच जिथे गव्हाच्या चपात्या मिळतील असं हॉटेल शोधून ठेवतो. तसे नाही जमलं तर गव्हाचा पाव घेतो. तोही नाही मिळाला तर भातच खातो. - दौऱ्यादरम्यान आवडलेला पदार्थ?
– विरारजवळील चिंचणी गावात आमचा काँण्ट्रक्ट शो होता. तिथे ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांची स्वतःची बोट होती. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांची बोट समुद्रात जाऊन मासे घेऊन येते हे प्रत्यक्ष बघता आलं. तेव्हा 4 फूट मोठय़ा सुरमई , वगैरे मासे बघता आलं. या माशांच्या तळलेल्या तुकडय़ा, कालवण यावर मनसोक्त ताव मारता आला. - घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?
– शाकाहारात वालाची उसळ, काळे वाटाणा उसळ ही आमच्या घरी छान बनते. पत्नी आणि आई चिकन आणि मासे उत्तम बनवते. - जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा काय खायला घालता?
– पाहुणे मांसाहारी असतील तर चिकन वडे असतात. हलवा, पापलेट, सुरमई असे तळलेले मासे. शाकाहारी असतील तर काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या आम्ही आवर्जून खाऊ घालतो. - उपवास करता का?
– शक्यतो उपवास करत नाही, पण माझे बाबा खूप धार्मिक वृत्तीचे होते. माझी पत्नीही धार्मिक आहे त्यामुळे जेव्हा काही धार्मिक कार्यक्रम असतील तर होतो उपवास. मुद्दामून, ठरवून प्रकृतीसाठी करत नाही.
























































