सिंधुदुर्गात वीज कोसळून गाईचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री वीज गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यावेळी कुडाळ शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल झाली. तर माणगांव खो-यातील गोठोस फणसवाडी येथे गोठ्यावर वीज कोसळल्याने एका गायीचा मृत्यू झाला आहे.

सिंधुदुर्गात बुधवारी रात्री परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने पिकलेल्या भातापिकांचे नुकसान झाले. तर कुडाळ तालुक्यात वीज गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गोठोस फणसवाडी येथे वीज पडल्याने काही घरांचे नुकसान झाले. यात रमाकांत सोमा घाडी यांच्या घरातील मीटर व टिव्ही बिघडला. तसेच काही ठिकाणी घराला भेगा पडल्या. तर जानू बाबू वरक यांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वायर जळून खाक झाल्या. तर शंकर नारायण सावंत यांच्या घराजवळ वीजेचे लोळ आले. यापूर्वीही या वाडीवर वीज पडून नुकसान झाले होते. दरम्यान जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.