मेरीटाइम बोर्डाकडून गाळ उपशावर पाच महिन्यांत 22 कोटींची उधळपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे गाळ उपसणीसाठी स्वतंत्र ड्रेजर यंत्रणा असतानाही खासगी कंपन्यांना ते काम देऊन गेल्या पाच महिन्यांत 22 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीमधून हा घोटाळा उघड झाला आहे.

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून राज्यभरातील विविध जेट्टी आणि खाडय़ांमध्ये गाळ उपसा केला जातो. त्यासाठी बोर्डाकडे स्वतंत्र ड्रेजर यंत्रणा आहे. गेल्या तीन वर्षांत या गाळ उपशासाठी किती खर्च केला गेला याची माहिती अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात मागितली होती. 2016 ते मे 2017 या कालावधीत मेरीटाइम बोर्डाने स्वतःच्या ड्रेजर यंत्रणेमार्फत वर्सोवा, गोराई, बोरिवली, कल्याण, देवबाग जेट्टी येथून गाळ उपसा केला. परंतु त्यानंतर खासगी यंत्रणेची मदत घेतली आणि त्यावर गेल्या पाच महिन्यांत 22 कोटी रुपये खर्च झाले अशी माहिती मेरीटाइम बोर्डाने दिली.