
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
यंदा प्रथमच वैद्यकीय संशोधनासाठी प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. कॅन्सर थेरेपी संशोधनासाठी जेम्स पी. ऑलिसन आणि तासुकू होंजो या दोघांना संयुक्त नोबेल देण्यात आले आहे. कॅन्सर टय़ूमरच्या विरोधात शरीरातील प्रतिबंधात्मक शक्ती वाढवण्याचे संशोधान ऑलिसन आणि होंजो या जोडीने केलेले आहे. त्यांच्या थेरपीमुळे अनेक कॅन्सरग्रस्तांचे प्राण वाचणार आहेत. यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार नाही. 70 वर्षांच्या नोबेल पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच साहित्याचा नोबेल देण्यात न येण्याची घटना घडली आहे. सर्वांचे लक्ष शांततेच्या नोबेल पुरस्कारावर लागले आहे. मात्र त्याआधी विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येत आहेत.
























































