
सामना ऑनलाईन । जयपूर
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जयपूर शहराच्या अनोख्या अशा द्रव्यावती नदी पुनरुत्थान प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प टाटा प्रोजेक्टस्ने उभारला असून त्याची लांबी 47.5 किलोमीटर आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी स्वच्छ करून नदीत सोडण्यात आले असून वर्षभर पाणी वापरता येणार आहे. प्रदूषण कमी करणे, दररोज 170 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, नदीच्या किनाऱयावर हरित स्थळे, सामाजिक स्थळे, सायकल ट्रक्स, जॉगिंग ट्रक्स, पुराचा धोका कमी करणे, रोजगारनिर्मिती करणे आणि जयपूरला एका स्कच्छ आणि स्मार्ट शहरामध्ये परावर्तित करणे ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. याव्यतिरिक्त किनाऱयावरील अतिक्रमणेही हटकली असल्यामुळे नदीला गतवैभव मिळणार आहे.


























































