
सामना प्रतिनिधी । पेण
रायगड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद द्विगुणित करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला निर्विवाद यश मिळवून देणार असल्याची ग्वाही नवनियुक्त जिल्हा प्रमुख किशोर जैन यांनी पेण तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात दिली. या सत्कार समारंभाला जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, शहर प्रमुख ओंकार दानवे, उपतालुका प्रमुख संतोष पाटील, प्रमोद घरत, अॅड. विकास म्हात्रे, वासुदेव म्हात्रे, नंदु मोकल, तुकाराम म्हात्रे, अत्च्युत पाटिल, राजा पाटिल, लवेंद्र मोकल , सुरेश कोळी , जगदिश ठाकुर, युवासेनेचे आशिष वर्तक, चेतन मोकल, गणेश पाटील, ईश्वर शिंदे, प्रसाद देशमुख, महिला आघाडीच्या गिता म्हात्रे, दिपश्री पोटफोडे, वंदना पाशिलकर, योगिता वर्तक, सौ.खाडे, विशाल दोशी, अरूण भोईर यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोर जैन म्हणाले की, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तसेच पेण तालुक्यात विविध प्रकारच्या विकास योजना राबविण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेनाच करीत आहे. जिल्हास्तरापासून बुथ लेव्हल पर्यंत शिवसेना संघटना मजबूत करून पक्षाची ताकद द्विगुणित करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.























































