पूर्वसूचना न देता आंगणेवाडी-मालवण एसटी बसफेरी मार्गात बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवण एसटी आगाराच्या सकाळी ६ वाजता. सुटणार्‍या डांगमोडे मसुरे आंगणेवाडी मार्गे मालवण या बसफेरीच्या मार्गात कोणतीही पुर्वकल्पना न देता बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थ तसेच विद्यार्थी वर्गामधुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बसफेरी पुर्ववत न केल्यास आंदोलन छेडण्याचा ईशारा आंगणेवाडी विकास मंडळाने दिला आहे.

ही बसफेरी आंगणेवाडी मार्गे महान मालवण अशी न नेता आंगणेवाडी मध्ये वळवण्यात आली आहे. ही बस भोगलेवाडी, बिळवस करुन मालवणला जात असल्याने आंगणेवाडीतील प्रवाशाना तसेच पास धारक विद्यार्थ्यांना नाहक पाच रुपयांचा भुर्दंड पडत आहे. आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या माध्यमातुन लाखो रुपयांचा नफा मिळवणार्‍या एसटी विभागाकडुन येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे तातडीने सदर बसचा मार्ग पुर्ववत न केल्यास एसटीची एकही फेरी आंगणेवाडी मार्गावरुन फिरु न देण्याचा ईशारा आंगणेवाडी विकास मंडळाचे शशी आंगणे यानी दिला आहे.