
सामना ऑनलाईन । मुंबई
मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर तुरुंगाची हवा खावी लागलेला हिंदुस्थानचा गोलंदाज एस. श्रीसंत पुन्हा एकदा तुरुंगात कैद झाला आहे. मात्र यावेळेस खऱ्या आयुष्यातील तुरुंग नसून ते बिग बॉसच्या घरातील तुरुंग आहे. श्रीसंतला घरात गैरवर्तन केले म्हणून घरातल्या सदस्यांनी तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. लवकरच हा एपिसोड टिव्हीवर दाखविण्यात येणार आहे.
बिग बॉसच्या घरात आठवडाभरात घरात गैरवर्तन करणाऱ्या, नियम न पाळणाऱ्या, घरातील कामे न करणाऱ्या तिघांना तुरुंगात पाठविण्याचा निर्णय घरातील सदस्य घेतात. या आठवड्यात श्रीसंतचे सुरभी राना, सबा खान, रोमिल चौधरी आणि दीपक यांच्यासोबत वाद झाल्याने घरातील सर्व मंडळी त्यांना तुरुंगात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीसंतसोबत अभिनेत्री नेहा पेंडसे आणि अभिनेता करणवीर बोहरा देखील तुरुंगात जाणार आहेत.


























































