
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर तालुक्यातील मौजे साखरा शिवारातून अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पळवल्याची घटना घडली. या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयकुमार ज्ञानोबा वाघमारे रा. साखरा ता.लातूर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या साखरा शिवारातील ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२४ इ २०२४ ची ट्रॉली किंमत १ लाख ५० हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळऊन नेले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस कर्मचारी कोंडामंगळे हे करीत आहेत.
































































