शेंबड्या म्हटल्याने तरुणाला टोच्याने भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

एकमेकांना चिडवताना एका मित्राने दुसऱ्याला शेंबड्या म्हणून टिंगल केल्याच्या रागातून त्याने टोच्याने गळ्यावर वार करून आणि पोटात भोसकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दांडेकर पूल येथील सव्र्हे क्रमांक १३३ येथे घडली.

केतन ननावरे (वय २३) असे जखमीचे नाव आहे. सुजित शेळके (वय २३) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छाया ननावरे (वय ५५, रा. दांडेकर पूल) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केतन आणि सुजित हे दोघे मित्र आहेत. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ते मित्रांसह गप्पा मारत उभे होते. ते एकमेकांची थट्टा मस्करी करत असताना केतनने एकाला तू शेंबडा आहेत असे उद्देशून म्हणाला. परंतु सुजितला वाटले की त्याने त्यालाच शेंबडा म्हटले आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुजितने पंक्चर काढण्याच्या टोच्याने केतनच्या गळ्यावर वार केला, त्यानंतर पोटामध्ये टोच्या भोसवूâन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.