‘राम मंदिर’ बनले नाही तर भाजपचा पराभव अटळ; साधुसंतांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, दिल्ली

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराची उभारणी झाली नाही तर येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल असा इशारा आज साधुसंतांनी दिला. विश्व हिंदू परिषदेची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर मोदी सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला. सरकार ‘डेडलाइन’ देणार नसेल तर आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही, असे ‘विहिंप’ने बजावले आहे. केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी करणारे निवेदनही राष्ट्रपतींना महंत नृत्य गोपालदास यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केले आहे.