वेबसीरिजच्या अश्लीलतेला आळा घाला, केंद्र, राज्य सरकारला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

देशात इंटरनेटवर सुरू असलेल्या वेबसीरिजमुळे पसरत असलेली अश्लीलता आणि बीभत्सतेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार ताशेरे ओढले. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टारसारख्या इंटरनेटवरील खासगी वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या ’अनसेन्सॉर्ड’ वेबसीरिजमधील हिंसक, प्रक्षोभक आणि अश्लील दृश्ये आणि भाषेला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याबाबत न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठाने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीला 31 ऑक्टोबरपर्यंत उत्तर द्यायचे आहे.

अॅड. दिव्या गोंटिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, यासंदर्भातली मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.