शॉक लागल्याने रेल्वे कर्मचारी होरपळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वासिंद

ब्लॉक संपण्यापूर्वीच पाच मिनिटे आधी ओव्हरहेडचा वीजपुरवठा सुरू केल्याने दुरुस्तीच्या कामात व्यस्त असलेला रेल्वे कर्मचारी शॉक लागून होरपळल्याची घटना शनिवारी घडली. बी.मीना (30) असे या कर्मचाऱयाचे नाव असून त्याला कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले आहे.

वासिंद रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीला लागूनच ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. या दुरुस्तीसाठी एक तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉक संपण्यापूर्वी पाच मिनिटे आधीच विजेचा प्रवाह सुरू झाल्याने मीना याला जबरदस्त शॉक बसला व तो खाली पडला. वेळेपूर्वीच हा प्रवाह कुणी सुरू केला याचा तपास रेल्वे प्रशासन करणार आहे.