
सामना प्रतिनिधी, नागपूर
लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर हिंदुस्थानी चालवतात! जर फक्त एक दिवस उत्तर हिंदुस्थानींनी काम केले नाही तर मुंबई ठप्प होईल. मुंबईकरांना जेवायला (रोटी-सब्जी) मिळणार नाही. आम्हाला असे करायचे नाही, मात्र तसे करण्यासाठी आम्हाला मजबूर करू नका अशा शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईकरांना धमकीच दिली आहे. नागपुरात उत्तर हिंदुस्थानींच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी ही आगपाखड केली.
मोदींनाही धमकी
गुजरातमध्ये उत्तर हिंदुस्थानींवर हल्ले होत आहेत. बलात्कारी नराधम उत्तरेतला होता. त्यामुळे सर्व उत्तर हिंदुस्थानींना दोषी मानणे चूक आहे. जर पंतप्रधानांच्या राज्यात उत्तर हिंदुस्थानींवर हल्ले होणार असतील तर याद राखा, एके दिवशी पंतप्रधानांनाही बनारसमध्ये जायचे आहे, अशी धमकीच निरुपम यांनी नरेंद्र मोदींना दिली.
summary- sanjay nirupam controversial statement on north indian
































































