नगर जिल्ह्यात पाणीटंचाई, आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

नगर जिल्ह्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. आज बारा तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जे पाणी आहे ते जुलैअखेरपर्यंत पिण्याचे पुरले पाहिजे याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात. महावितरण ,महसूल तसेच वीज यांची पथके तयार करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले. तसेच अनधिकृत पाणी उपसा केला जातो. तेथील अनधिकृत वीज कनेक्शन तत्काळ सोडण्यात यावे, याची अंमलबजावणी त्वरित करावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार मोनिका राजळे, आमदार विजय औटी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, जिल्हाधिकारी राहुल दिवेदी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते. सुरुवातीला शहरातील तसेच जिल्ह्यातील पाण्यासंदर्भाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार वैभव पिचड यांनी धरणांमध्ये पाणी आहे, मात्र चाऱ्यासाठी सुद्धा पाणी नाही, अशी विचित्र अवस्था झाली आहे. पाण्याचे स्त्रोत सर्वत्र आटत चालले आहेत. परिस्थिती भयानक होणार आहे, भंडारदरा सोडलं तर इतरत्र पाणी नाही. त्यामुळे त्यांची टँकरची मागणी वाढणार आहे, असे पिचड म्हणाले.

जिल्ह्यामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे आजच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येत आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगून आज 27 टक्केच पाणीसाठा आहे त्याचे नियोजन आपल्याला करावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन येथे अवैध पाणी उपसा होत आहे. तेथील वीज कनेक्शन तात्काळ बंद करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार टीका केली. 14 व्या वित्त आयोगातून 22 कोटी रुपये महावितरणला जमा केले आहेत. मात्र याची नोंद महावितरणकडे नाही, ही गंभीर बाब आहे. जर उद्या भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाली, तर त्याला जबाबदार कोण राहणार अशा शब्दात त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करता येत नाही का, असा सवाल पालक मंत्री राम शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. नगर जिल्हा हा काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे का, अशा शब्दात त्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी यावेळी केली. पाणी पुरवठा युनियनचे कोणतीच तर बाकी राहिली नसावी असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. मात्र सगळाच महावितरणाचा सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. याबाबत, तत्काळ आम्हाला माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी महावितरणला दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी बोलुन सुद्धा जर बैठकीला उपस्थित राहणार नसेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे अशी भूमिका आमदार शिवाजी कर्डिले यांनी यावेळी मांडली. त्यावर पालकमंत्री राम शिंदे यांनी पूर्वपरवानगी न घेता जर कोणी गैरहजर राहिला असेल तर त्याची गय केली जाणार नाही असेही पालकमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

summary- ram shide ordered to remedies for water supply