
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्थानला आशिया कप जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा बंगळुरू येथे सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे. बादफेरीत तो संघासाठी खेळणार असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
हाय क्लास आंतरराष्ट्रीय खेळाडू
रोहित शर्मा हा हाय क्लास आंतरराष्ट्रीय खेळाडू असून त्याच्या समावेशाने मुंबईच्या खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. तो वन डे स्पेशालिस्ट असल्यामुळे संघासाठीही ही महत्त्वाची बाब ठरणार आहे, असे स्पष्ट मत प्रशिक्षक विनायक सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.
अजिंक्य, पृथ्वी, शार्दूल हिंदुस्थानसाठी खेळताहेत
या लढतीत मात्र अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ व शार्दूल ठाकूर हे खेळाडू खेळणार नाहीत. कारण ते हिंदुस्थानसाठी खेळत आहेत.
























































