भगवी लाट येणार, राम मंदिराची वीट रचणार; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची अयोध्येला उत्सुकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं वृत्तप्रसिद्ध होताच अयोध्येसह उत्तर हिंदुस्थानात हिंदू समाजात चैतन्य निर्माण झालं आहे. सगळीकडे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचीच चर्चा आहे. या दौऱ्याआधी अयोध्येतील तयारीची पहाणी करण्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज अयोध्येला भेट दिली. यावेळी लोकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची उत्सुकता लागल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेना पक्षप्रमुख अयोध्येत कधी येणार, कोण-कोणत्या ठिकाणांना भेट देणार, कोणत्या साधूसंतांशी चर्चा करणार, असे विविध प्रश्न अयोध्येच्या जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यांच्या आगमनावेळी काही कमी पडू नये म्हणून उत्तर प्रदेशातील शिवसैनिकांसोबतच तमाम हिंदू कार्यकर्ते देखील तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे या दौऱ्यादरम्यान अयोध्येत सभा घेणार का? ते काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यासंदर्भात दसरामेळाव्यात उद्धव ठाकरे बोलणार असल्याने साऱ्या उत्तर हिंदुस्थानचं लक्ष आता या मेळाव्याकडे लागलं आहे.