व्ही.एस.डूबे पेट्रोल पंपावर झालेल्या दगडफेकी विरोधात आर्यवैश्य समाज एकवटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

गुरुवारी इंधन दरवाढीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शहरातल्या व्ही.एस.डुबे यांच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर झालेल्या दगडकीनंतर आज शुक्रवारी शहरातील आर्यवैश्य समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत दगडफेक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी संभाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यासाठी शहरातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्यवैश्य समाज बांधवांच्या वतीने संभाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवदेनात शहरात असलेली दहशत तात्काळ थांबवावी आणि गुरुवारी व्ही. एस.डुबे यांच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर दगडफेक केलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवदेनावर जुगलकिशोर लोहिया, अशोक जैन, दत्तापा इटके, वैजनाथ जगतकर, विकास डुबे, सुहास डुबे, सुनील डुबे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि आर्यवैश्य समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.