पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांची धावाधाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांना एक ईमेल आला आहे, या ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये 2019 हे वर्ष  लिहण्यात आलं आहे सोबतच महिना आणि तारखेचाही उल्लेख करण्यात आला आहे. हा ईमेल आसाममधल्या व्यक्तीने पाठवला असावा असं पोलिसांना वाटत आहे. पोलीस या ईमेलमुळे हादरले असून त्यांची जबरदस्त धावपळ सुरू झाली आहे.