
धावत्या लक्झरी बसमधून एक तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला. सुदैवाने या बालकाचे प्राण वाचले. त्याची आई मोबाईल कॉलवर बोलण्यात गुंग होती. मुलगा कधी चालकाजवळच्या दरवाजापर्यंत पोहोचला, हे तिला कळलेच नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली. ही घटना 7 नोव्हेंबरला घडली होती, मात्र आज हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. ही बस राजकोट येथून सुरतला जात होती. महिला तीन वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षीय मुलीसोबत प्रवास करत होती.



























































